सातारा : महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कोडोली येथील एका महिलेच्या किराणामाल दुकानात एक अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आली. त्या व्यक्तीने संबंधित तक्रारदार महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.