सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक विवाहिता राहत्या घरातून कामास जाते, असे सांगून निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.