गोडबोले ट्रस्टच्या वतीने येत्या रविवारी शिष्यवृत्ती प्रदान सोहळा - डाॅ. अच्युत गोडबोले यांची माहिती

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विद्यार्थी व  शैक्षणिक संस्थांच्या करिता शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम येत्या रविवारी दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सातारा येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र ,राजवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे .

सकाळी साडेआठ ते बारा या वेळेत तीन विभागात हा शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे . ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना तसेच शैक्षणिक संस्था यांना संबंधित शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष डाॅ. अच्युत गोडबोले यांनी केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये नायलॉन मांजा विक्रीवर बंदी; नियम मोडल्यास परवाना रद्द होणार - मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे स्पष्ट निर्देश
पुढील बातमी
तासवडे व मलकापुरात मुदत संपलेल्या बिअरची विक्री, विनापरवाना गूळ रिपॅकिंगवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

संबंधित बातम्या