फलटणमध्ये नायलॉन मांजा विक्रीवर बंदी; नियम मोडल्यास परवाना रद्द होणार - मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे स्पष्ट निर्देश

by Team Satara Today | published on : 06 August 2026


​फलटण: आगामी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात चायनीज व नायलॉन मांजाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा कडक इशारा नगरपरिषदेने दिला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी यासंदर्भात शहरातील सर्व व्यापारी व गाळेधारकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

​येत्या सोमवारी शहरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. मात्र, पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नायलॉन व चायनीज मांजाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या घातक मांजामुळे नागरिक तसेच पशुपक्ष्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण होत आहे.

​यापूर्वी शहरात नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर राज्यातील काही भागांत यामुळे प्राण गमावण्याचे दुर्दैवी प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली असून, शहरातील दुकाने, गाळे किंवा घरांमधून असा मांजा विकताना आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांचा व्यवसाय परवाना त्वरित रद्द केला जाईल. नगरपालिकेच्या या निर्णयाचे शहरातील नागरिकांमधून स्वागत होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माेलॅसीस लायसन्स काढून देतो, असे आमिष दाखवून एका तरुण व्यावसायिकाची ४ लाख ३८ हजारांची फसवणूक
पुढील बातमी
गोडबोले ट्रस्टच्या वतीने येत्या रविवारी शिष्यवृत्ती प्रदान सोहळा - डाॅ. अच्युत गोडबोले यांची माहिती

संबंधित बातम्या