माेलॅसीस लायसन्स काढून देतो, असे आमिष दाखवून एका तरुण व्यावसायिकाची ४ लाख ३८ हजारांची फसवणूक

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : ऊसाच्या मळीच्या स्टोरेजसाठी लागणारे माेलॅसीस लायसन्स काढून देतो, असे आमिष दाखवून एका तरुण व्यावसायिकाची ४ लाख ३८ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाणे, सातारा येथे नाशिक येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रनिल अरुणकुमार बॅनर्जी (वय ४६, रा. कालीबारी हाउसिंग सोसायटी पांडवलेणी पाथर्डी, नाशिक) असे त्याचे नाव आहे.

याबाबत नीलेश शंकरराव जगताप (वय ३६, रा. मयुरेश्वर कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ते व्यावसायिक असून, इंडिया मार्ट प्लॅटफॉर्मवर इंद्रनिलसोबत त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते मुंबई येथे प्रत्यक्षात त्याला भेटले. त्यावेळी उसाच्या मळीसाठी लागणारे मोलॅसीस लायसन्स काढून देतो, असे त्याने सांगितले. जगताप यांनी त्याला नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन ४ लाख ४३ हजार रुपये दिले. त्यापैकी ५ हजार रुपये त्याने परत केले. मात्र, त्याने लायसन्स काढून दिले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जगताप यांनी त्याच्याकडे राहिलेले ४ लाख ३८ हजार रुपये मागितले. मात्र, ते पैसे त्याने परत दिले नाहीत. त्यामुळे जगताप यांनी सातारा शहर पोलिस ठाणे, सातारा येथे फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक जगदाळे हे अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये चायनीज मांजामुळे माजी सैनिक गंभीर जखमी; बंदी असतानाही मांजाची खुलेआम विक्री, आठवड्यात दोघे जखमी
पुढील बातमी
फलटणमध्ये नायलॉन मांजा विक्रीवर बंदी; नियम मोडल्यास परवाना रद्द होणार - मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे स्पष्ट निर्देश

संबंधित बातम्या