महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी करंजे येथील एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4  रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका किराणामालाच्या दुकानासमोर लघवीसाठी उभे राहून एका महिलेशी असभ्य वर्तन करुन तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी रवी सुरेश कुंभार (रा. करंजे, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवथर येथील दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
फलटणमध्ये चायनीज मांजामुळे माजी सैनिक गंभीर जखमी; बंदी असतानाही मांजाची खुलेआम विक्री, आठवड्यात दोघे जखमी

संबंधित बातम्या