एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवथर येथील दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास निलेश महेंद्र दयाळ (रा. शिवथर, ता. सातारा) यांनी आमच्या जमिनीचा बांध का फोडताय, असे विचारल्याच्या कारणावरून तेथीलच संतोष बाळकृष्ण चाफेकर आणि श्रेयस संतोष चाफेकर या दोघांनी लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दयाळ यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने जोराचा वार केला आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी अल्पवयीनावर गुन्हा
पुढील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी करंजे येथील एकावर गुन्हा

संबंधित बातम्या