अधिक परताव्याच्या आमिषाने साताऱ्यातील पाच जणांची 29 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : अधिक परताव्याच्या आमिषाने पाच जणांची सुमारे 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 12 नोव्हेंबर 2021 ते 9 मे 2022 दरम्यान किशोर विजयकुमार कदम (रा. मंगळवार पेठ सातारा) याने गुडविल वेल्थ मॅनेजमेंट येथे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून दीपक चिंतामण गाडगीळ (रा. शुक्रवार पेठ, सातारा) व त्यांची पत्नी यांचे 18 लाख रुपये, गाडगीळ यांचा भाऊ प्रकाश याचे 9, गाडगीळ यांचे मित्र सुरेश व किरण यांचे प्रत्येकी एक एक लाख असे एकूण 29 लाख रुपये घेऊन परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बागवान पुढील तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील शनिवार पेठ येथे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी अल्पवयीनावर गुन्हा

संबंधित बातम्या