सातारा शहरातील शनिवार पेठ येथे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील शनिवार पेठ येथे असलेल्या राहत्या घरामध्ये 14 हजार 500 रुपये किंमतीची गांजाची सुकलेली पाने, फुले, बोंडे, देठे, बिया विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी दोन महिलांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पुढील बातमी
अधिक परताव्याच्या आमिषाने साताऱ्यातील पाच जणांची 29 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

संबंधित बातम्या