सातारा : विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मे ते जुलै 2026 या कालावधीत आरोपींनी चारित्र्यावर संशय घेत वारंवार अपमान, शिवीगाळ व मारहाण केली. तसेच उपाशी ठेवून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.