सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दगडफेक करणार्यांना विरोध करणार्या तरुणावर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समाधान जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. गोंधळादरम्यान रोख रक्कम व सोन्याची अंगठी हरवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक कचरे करीत आहेत.