सातारा : दोन गटांतील वाद मिटवल्याचा राग मनात धरून घरात घुसून महिलेला मारहाण व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने दारूच्या नशेत कोयता घेऊन घरात प्रवेश केला. महिलेला मारहाण करत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तिच्या दीरावरही दगड व विटांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.