कोयना धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा; धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त

by Team Satara Today | published on : 05 August 2026


सातारा  : कोयना धरण पाणलोट क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवजा येथे 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर त्या तुलनेत महाबळेश्वर येथे 68 आणि कोयनानगर येथे 43 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण थोडे कमी असल्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही थोडी कमी झाली असून 24 तासात धरणातील पाणी पातळीत 2.30 टीएमसीने वाढ झाली असून धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. सोमवारी वाढलेला पावसाचा जोर मंगळवारी आणि बुधवारी सकाळच्या टप्प्यात थोडा कमी झाला आहे. मात्र नवजा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. नवजा येते 24 तासात तब्बल 123 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आह.

त्या तुलनेने नवजा व महाबळेश्वर येथे पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्याचे धरण व्यवस्थापनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा वाढत असल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे चार दिवसापासून चार फुटावर स्थिर ठेवण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'सरकारकडून मराठा समाजाचा छळ'; कुणबी जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणांवरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल

संबंधित बातम्या