सातार्‍यातील यादोगोपाळ पेठेत पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने महिलांनी केले रास्ता रोको आंदोलन

by Team Satara Today | published on : 05 August 2026


सातारा : सातार्‍यातील यादोगोपाळ पेठेतील पोरे बोळ परिसरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी राजवाडा ते समर्थ मंदिर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आक्रमक महिलांनी वाहने रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली. यावेळी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.

यादोगोपाळ पेठ परिसरातील काही घरांना अवेळी, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे या पेठेतील महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले. संतप्त महिलांनी रस्त्यांवर हंडे मांडून रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनीही धाव घेतली. या परिसराचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी भेट घेतली. त्यांनी महिलांची समजूत काढल्यावर आंदोलन मागे घेतले. नगरसेवक व नागरिकांनी सुचवलेली कामे प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावीत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे संदीप सावंत उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
थायलंडहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत १२ प्रवासी जखमी; अतिशय अवघड स्थितीत विमान सुरक्षित उतरवलं
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँकेचा गुलाल लावूनच सोलापुरात जाणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य, राजकारणाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे

संबंधित बातम्या