युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 August 2026


सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका होस्टेलमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय युवतीचा पाठलाग करून तिला फोनवरून शिवीगाळ करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी प्रतिक हणमंत शिंदे रा. चिमणगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन महिन्यांचा पीओएस डेटा ठेवावा
पुढील बातमी
साताऱ्यातील जपान कराटे असोसिएशनच्या जकातवाडी येथील नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहात

संबंधित बातम्या