सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासुन सुरु असलेला पावसाचा जोर आज मंगळवारी सकाळपासुन ओसरला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत मुसळधार पडणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने कोयना पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसराला दिलासा मिळाला आहे. कोयना धरणा परिसरात पावसाचा जोर कमी पडल्याने कोयना धऱणातील पाण्याच्या आवकेतही घट झाली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर आज मंगळवारी सकाळनंतर ओसरला आहे. आज शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासुन कोयनानगरला 7, नवजाला 29 आणि महाबळेश्वरला 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धऱणात येणाऱ्या पाणीसाठ्याचीही आवक कमी झाली आहे. धरणाचे दरवाजे चार फुटावर स्थिर आहेत. धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सकाळी आठ वाजल्यापासुन सायंकाळी पाच वाजेपर्यंत .93 टीएमसी पाण्याची वाढ कोयना धऱणात झाली आहे. कोयना धरण परिसरातील कोयनानगरला 7, नवजाला 29 आणि महाबळेश्वरला 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धऱणात येणाऱ्या पाणी साठ्याचीही आवक कमी झाली आहे. धरणाचे दरवाजे चार फुटावर स्थिर आहेत. धऱणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटावर स्थिर असुन त्यातुन 23 हजार 858 क्युसेक आणि पायथा वीजगृहातुन 1050 क्युसेक असा एकुण 24 हजार 908 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.