सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती व महिला बेपत्ता

by Team Satara Today | published on : 31 July 2026


सातारा : शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक युवती व महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी वीस वर्षीय युवती कोणास काही एक न सांगता शहरातील एका कॉलेज परिसरातून बेपत्ता झाली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, सातारा शहरात राहणारी तीस वर्षीय विवाहिता राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध दारू विक्री प्रकरणी दोन जणांवर सातारा तालुका पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या