सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी तासगाव मुळीकवाडी बस स्टॉप च्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास अवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी तेथीलच उमेश सदाशिव यादव याच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून 2710 किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या कारवाईत, तासगाव येथीलच हॉटेल वाडा चिरेबंदी जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडच्या बाजूस अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आलेल्या संदीप ज्ञानू मोहिते (रा. धनगरवाडी, पोस्ट निगडी, ता. सातारा) यांच्याकडून 2860 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.