सातारा : शहरातून अज्ञात चोरट्याने दोन दिवसांची चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रभान रामसमुज सिंग (रा. चंदननगर, कोडोली) यांची घराच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 22 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अजित बाळासाहेब सुरले पाटील (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांची यामाहा कंपनीची दुचाकी क्र. एमएच 11 डी 1408 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.