सातारा : शहरातील धनगरवाडी येथे अज्ञात चोरट्याने सुमारे 50 हजारांची घरपोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 ते 18 जुलै दरम्यान शिल्पा विजय जगदाळे रा. धनगरवाडी, सातारा यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे 48 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.