उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

by Team Satara Today | published on : 31 July 2026


बीड : उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना पडकल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. या घटेनंतर प्रशासनात चांगली खळबळ उडाली आहे. श्रीनिवास लखमावार असं या अधिकाऱ्यांचं नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर श्रीनिवास लखमावार आपल्या शासकीय कामकाजातून थेट निवासस्थानी परतले. याच ठिकाणी एसीबीने आधीपासूनच सापळा रचला होता. संबंधित रकमेची देवाणघेवाण सुरू असतानाच पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या कारवाईनंतर वन विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या कथित लाच प्रकरणामुळे भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई पुन्हा चर्चेत आली असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्ती आणि इतर संभाव्य धागेदोरे तपासण्याचे काम एसीबीकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आता तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र, एसीबीकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा प्रशासनात सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धोम धरणाचा विसर्ग वाढला; कृष्णा नदीला पूरस्थिती, महागणपती मंदिरासह अनेक मंदिरांत पाणी शिरले
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार; सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव

संबंधित बातम्या