सातारा : तासगाव, ता. सातारा येथील एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई करून एका व्यक्तीस ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्यांसह 7,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पत्रा शेडच्या आडोशाने दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी सचिन मानसिंग जामदार (वय 46, रा. तासगाव) याच्याकडून संत्रा देशी दारूच्या 90 मिलीच्या 92 आणि 180 मिलीच्या 27 बाटल्या जप्त करण्यात आल्या.