गुरुवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून एका व्यक्तीवर कारवाई

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : गुरुवार पेठेतील गुरुवार परज परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

सलून दुकानाच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी मोहम्मद मेहबूब खान (वय 65) याच्याकडून 610 रुपये रोख तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वावदरे गावच्या हद्दीत असणार्‍या पवनचक्कीमधील केबल चोरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
तासगाव येथील अवैध दारूविक्रीवर कारवाई; 7,820 रुपयांचा माल जप्त

संबंधित बातम्या