गुटखा विक्री प्रकरणी सातारा शहरातील दोन पानपट्टी चालकांवर गुन्हे

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : राज्यात बंदी असलेला गुटखा अवैधरीत्या विक्री केल्याप्रकरणी सातारा शहरातील दोन पानपट्टी चालकांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास भारत गोपीचंद पवार यांच्या सेव्हन स्टार मॉल समोरील पान शॉप मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 2840 रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. याप्रकरणी पवार यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करीत आहेत.

दुसर्‍या कारवाईत, जुना मोटर स्टॅन्ड पेट्रोल पंपाजवळील नरसिंह पान शॉप मध्ये बाळासाहेब बबन रवले रा. चंदन नगर, सातारा यांच्या ताब्यात 3498 रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँक निवडणुकीची रंगीत तालीम सुरू; आखाडेतील घडामोडींनी राजकीय समीकरणांना वेग
पुढील बातमी
वावदरे गावच्या हद्दीत असणार्‍या पवनचक्कीमधील केबल चोरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या