पाडेगाव येथील पाण्याचा टँकर चाेरणार्‍यांना लिंबखिंडजवळअटक; चोरीच्या गुन्ह्याचा एलसीबीकडून एका दिवसात छडा

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : पाण्याचा टँकर चोरीच्या गुन्ह्याचा एलसीबीने एका दिवसात छडा लावत १३ लाख रुपये किमतीचा चोरीचा टँकर जप्‍त करून दोघांना अटक केली. अनिकेत लकडे (वय २५, रा. पाडेगाव, ता. फलटण), शुभम जैस्‍वाल (१८, रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी संशयितांची नावे असून, साथीदारांचा शोध सुरू आहे.

२६ जुलै रोजी पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राच्या कार्यालयाजवळ पार्किंगमध्ये पाण्याचा टँकर अज्ञाताने चोरून नेला होता. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एलसीबीचे पोनि विश्वजित घोडके यांना गोपनीय माहिती मिळाली की, सातारा शहरालगत लिंबखिंड येथे दोघेजण निळ्या-पांढऱ्या रंगाचा टँकर विक्रीसाठी ग्राहक शोधत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक लिंबखिंड येथे पाठवण्यात आले.

सातार्‍यात पकडला टँकर...

पोलिसांनी टँकरबाबत विचारणा करून कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने पाडेगाव येथून हा टँकर चोरी केल्याची कबुली दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती; महायुती सरकारचा ऐतिहसिक निर्णय
पुढील बातमी
तपासाच्या नावाखाली विश्रामबाग पोलिसांचा सातारा पर्यटनाचा प्रकार समोर; महिला अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई

संबंधित बातम्या