सातारा : सातारा शहरातील मनाली बेकरी ते राधिका सिग्नल परिसरात भाजी विक्री करणार्या एका महिलेचा पाठलाग करून तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी करणार्या व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास 29 वर्षीय महिला रस्त्यालगत भाजी विक्री करत असताना दिलीप माने (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने वारंवार तिच्याकडे पाहत हातवारे केले आणि मोबाईल क्रमांक देण्याचा आग्रह धरला. या प्रकारामुळे संबंधित महिलेच्या मनात भीती व लज्जा निर्माण झाल्याने तिने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिस हवालदार अवघडे तपास करत आहेत.