अधिक परताव्याच्या आमिषाने सातार्‍यातील इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकाची सुमारे 30 लाखांची फसवणूक

by Team Satara Today | published on : 28 July 2026


सातारा : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गुंतवणूक करण्यास भाग पाडत सातार्‍यातील एका इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकाची 30 लाख 43 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल विद्याधर इनामदार (रा. तामजाईनगर, सातारा) यांच्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत अनुभवसिंग नावाच्या व्यक्तीने विविध खात्यांमध्ये ऑनलाइन व आरटीजीएसद्वारे पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. भरघोस नफा मिळेल, असा विश्‍वास निर्माण करून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम स्वीकारली. मात्र, त्यानंतर ना गुंतवलेली रक्कम परत करण्यात आली, ना कोणताही परतावा देण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शेवाळे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुना मोटर स्टँड मंडई परिसरात बेकायदा ताडी विक्रीप्रकरणी एकावर कारवाई; ताडीसह रोख रक्कम जप्त
पुढील बातमी
साताऱ्यात दळण आणण्यासाठी निघालेल्या महिलेची सोनसाखळी हिसकावली

संबंधित बातम्या