जुना मोटर स्टँड मंडई परिसरात बेकायदा ताडी विक्रीप्रकरणी एकावर कारवाई; ताडीसह रोख रक्कम जप्त

by Team Satara Today | published on : 28 July 2026


सातारा : जुना मोटर स्टँड मंडई परिसरात सुरू असलेल्या बेकायदा ताडी विक्रीवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करत ताडीचा साठा व रोख रक्कम जप्त केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ विठ्ठल मोरे (वय 55, रा. प्रतापगंज पेठ) हा वडाच्या झाडाजवळील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला ताडीची विक्री करत होता. छापा टाकून पोलिसांनी प्रत्येकी एक लिटरच्या नऊ पिशव्यांतील ताडी आणि 1,130 रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई पोलिस हवालदार विजय कांबळे यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात भाजी विक्रेत्यावर दगडाने हल्ला; अज्ञाताविरोधात गुन्हा
पुढील बातमी
अधिक परताव्याच्या आमिषाने सातार्‍यातील इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकाची सुमारे 30 लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या