दोघांना मारहाण केल्याप्रकरणी देगाव येथील चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास देगाव ता. सातारा येथील साईराज महेंद्र घाडगे (रा. देगाव, ता. सातारा)  हा युवक त्याचा भाऊ तन्मय याच्यासोबत घरी जात असताना तेथीलच अभिजीत साळुंखे, राहुल साळुंखे, नितीन साळुंखे, यश चव्हाण यांनी लाकडी दांडके व उसाच्या दांडक्याने घाडगे बंधूंना मारहाण केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देगाव येथील चौघांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या