बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मद्यपीच्या दुचाकी चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : दुचाकी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट ते एमआयडीसी जाणाऱ्या रस्त्यावर महेश मारुती पाटील (रा. बोरखळ, ता. सातारा) हे मद्याच्या अंमलाखाली असल्याने त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका अज्ञाताला त्यांची गाडी (क्र. एमएच 11 डीएल 2697) वरून त्यांना घरी सोडण्याची विनंती करत त्या अज्ञाताकडे गाडीची चावी दिली. अज्ञाताने गाडीला चावी लावून तो गाडी घेऊन पळून गेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोळेवाडीच्या युवतीची साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या