साताऱ्याचे कलावंत सुरज दयाळ नृत्यजीत पुरस्काराने सन्मानित; एयर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : साताऱ्याच्या सुरज वसंत दयाळ यांना जनकल्याण बहू उद्देशीय फाउंडेशन पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज, पुणे  यांच्या वतीने नृत्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल २०२६ च्या राज्यस्तरीय नृत्यजीत पुरस्काराने गौरविले गेले.  

सातारच्या नृत्य विश्वामध्ये लोभस, गोड आणि सदैव सर्वांच्या मदतीला धावणार कलावंत अशी सूरज यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या गौरवाबद्दल सातारच्या नृत्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण  आहे. सूरज दयाळ यांनी हा पुरस्कार त्यांच्या वडिलांसोबत एयर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सत्काराला उत्तर देताना  दयाळ म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत नटराजाची सेवा करण्याचं बळ मला ह्या पुरस्कारामुळे मिळालं. 

सूरज दयाळ यांचे या पुरस्काराबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मेघराज राजे भोसले, शहाजी पाटील, आशुतोष पाटील, सुमित साठे, प्रसाद नारकर, कल्याण राक्षे, नंदकुमार बागडे, सुधीर साळुंखे, मोहनिश अवघडे, अक्षय सावंत, ऋषिकेश परदेशी, राहुल निकम, बाळकृष्ण शिंदे या मान्यवरांनी अभिनंदन केले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, दिल्लीत जाण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम
पुढील बातमी
साताऱ्याचे कलावंत सुरज दयाळ नृत्यजीत पुरस्काराने सन्मानित; एयर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

संबंधित बातम्या