शिरवळ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत मालट्रकच्या वायपरचा रॉड स्टिअरिंगवर पडल्याने तो महामार्गाच्या बाजूला उभा केला होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या लक्झरी बसने दिलेल्या धडकेत लक्झरीमधील १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी लक्झरी बसचा चालक वैभव तात्याबा पवार (वय ३७, रा. पाटण) याच्याविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील जवाहर साखर कारखान्याची साखर पोती मालट्रक क्रमांक (एमएच ५० एन ३८८८) मध्ये भरून वाशी मार्केट, मुंबई येथे चालक रमाकांत चुडामन यादव (३५) हा घेऊन निघाला होता. मालट्रक गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास धनगरवाडी हद्दीत एका हॉटेलजवळ आला असता, मालट्रकचा वायपर रॉड अचानकपणे स्टिअरिंगवर पडल्याने ट्रकचालक रमाकांत यादव याने ट्रक महामार्गाच्या बाजूला घेतला.
त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या लक्झरी बस क्रमांक (एमएच ०४ एनबी १४५४) वरील चालक वैभव पवार याचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटल्याने मालट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत लक्झरी बसमधील १८ प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिस, सारोळा महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी धाव घेत जखमींना शिरवळ ग्रामपंचायत, १०८ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी लक्झरी चालक वैभव पवार याच्याविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार नितीन नलावडे पुढील तपास करत आहेत.
जखमी प्रवासी ....
खाशाबा पांडुरंग कदम, ५ वर्षे, रा. पाटण केरळ लुगडेवाडी
स्लोक नितीन शिर्के, १८, रा.लोगी ता.खटाव
शुभम संतोष जगताप, २८, रा.टोरेवाडी पोस्ट नुने ता जि सातारा
रामचंद्र आनंदराव शिंदे, ५०, रा.घोट ता. जि सातारा
अदित्य प्रकाश शेडगे, १९, रा.कोडोली ता जि सातारा
गणेश दिपक सपकाळ, ३९, रा.चिपळूण जि रत्नागिरी
विलास गणपत पवार, ५२, मरळी ता पाटण हल्ली रा चंबूर
सुनिता विलास पवार, ३३, मरळी ता पाटण हल्ली रा चंबूर
भारती सहाराम पाचपुते, ३७, सांगोड सुर्यवंशीवाडी ता पाटण
सखाराम विलास पाचपुते, ३८, सांगोड सुर्यवंशीवाडी ता पाटण
सुनिता प्रकाश कदम, २५, मानखुर्द मुंबई
ईश्वरी साहील कुमार, २१, रा चंबूर मुंबई
उज्वला आनंदराव कुंभार, ४०, रा चंबूर मुंबई
धोंडीराम दगडू हेडगे, ३६, डोणीचावाडा
साहील आनंदा कुमार, २१, रा चंबूर मुंबई
सुरज येसंत सावंत, ३०, रा पाटण जि सातारा
आनंदा वसंत कुमार, ४, रा दिवशी पाटण हल्ली रा चंबूर
साही गणेश सपकाळ, ३८, रा.बेतवाडे नवारस्ता ता पाटण जि सातारा