आता देशात 'भाजप विरुद्ध भारत' अशा मोठ्या संघर्षाची सुरुवात - उद्धव ठाकरे, धान यांनी राजीनामादिल्याने ठाकरे बंधूंचा मुंबईत जल्लोष मेळावा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


मुंबई  : "देशातील तरुण मुलांनी आज एक सुवर्णपान लिहिलं आहे. अंधभक्तांविरोधात अखेर देशभक्त जिंकले असून, आता देशात 'भाजप विरुद्ध भारत' अशा मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली आहे," अशा शब्‍दांमध्‍ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्‍लाबोल केला. शिवाजी पार्क येथील जल्‍लोष मेळाव्‍यात ते बोलत होते. देशातील तरुण आंदोलकांनी (जेन झी) सरकारच्या झिंंज्या कशा उपटतात, हेच या आंदोलनातून दाखवून दिले आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.

२१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्‍यानिमित्त ठाकरे बंधूंनी मुंबईत जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्‍याच्‍या सुरुवातीला 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निराश होऊन जीवन संपवलेल्‍या २१ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जीवन संपवलेल्‍या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली. तसेच सर्वांना एक मिनिटांचे मौन बाळगून २१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्‍यात आली. यानंतर "ज्या विद्यार्थ्यांनी या अन्यायामुळे आपले जीवन संपवले आहे, त्यांच्या यातना आणि त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही," असा निर्धार यावेळी करण्‍यात आला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटीचा आरोप, १०० पैकी ९० प्रश्न व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व आरोप फेटाळले
पुढील बातमी
शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी; देशभर होणार ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने - अध्यक्ष योगेश सोमण यांची माहिती

संबंधित बातम्या