सुबह हो गई मामू... लोकशाहीची सकाळ झाली; आम्ही राजीनामा घेऊन दाखवला, अभिजीत दीपकेची पहिली प्रतिक्रिया

by Team Satara Today | published on : 25 July 2026


दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला आहे. पंतप्रधानांनीही तो स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, या संपूर्ण चळवळीची सुरुवात करणारे अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. "सुबह हो गई मामू... लोकशाहीची सकाळ झाली आहे. देशाची जनता जागी झाली आहे. मी आधीच सांगितलं होतं, ही पहिली विकेट आहे. इथेच थांबणार नाही, ही तर फक्त सुरुवात आहे," असे अभिजित दिपके म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी, "मला हिरो बनवू नका. ही चूक पुन्हा करू नका. एका व्यक्तीला हिरो बनवल्यामुळे आणि त्याला संविधानापेक्षाही मोठं मानल्यामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. मी मोडेन, पण वाकणार नाही. चुकीच्या माणसाशी पंगा घ्यायचा नाही," असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. "या सरकारमध्ये कोणीही राजीनामा देत नाही, असं सरकारच म्हणत होतं. पण आम्ही राजीनामा घेऊन दाखवला," असा दावा अभिजित दिपके यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बिहारमध्ये हिसेंचा भडका!आंदोलकांनीही दगडफेक करत गाड्यांची केली जाळपोळ
पुढील बातमी
'देशातील लोकशाहीने कात टाकली'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया

संबंधित बातम्या