धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बिहारमध्ये हिसेंचा भडका!आंदोलकांनीही दगडफेक करत गाड्यांची केली जाळपोळ

by Team Satara Today | published on : 25 July 2026


बिहार : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बिहारमध्ये ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, अनेक जिल्ह्यात आणि शहरांत आंदोलनांना हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनीही दगडफेक करत गाड्यांची जाळपोळ केली. 

बिहारची राजधानी पाटण्यात आंदोलन करत असलेल्या तेज प्रताप यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तरुणांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते पोहोचले होते. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा पाटणा पोलिसांनी केला आहे.

भागलपूरमध्येही विद्यार्थ्यांचा गदारोळ

नीट पेपरफुटी प्रकरणावरून भागलपूरमध्येही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. विद्यार्थी इतके संतप्त झाले की त्यांनी तिलका मांझी चौकात उभ्या असलेल्या डीएसपी यांच्या गाडीला आणि पोलिसांच्या व्हॅनला लक्ष्य करत मोठी तोडफोड केली. यासोबतच पोलीस दलावर दगडफेकही करण्यात आली आहे. सध्या तिलका मांझी चौकातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. गोंधळादरम्यान उपद्रवी लोकांनी पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यातील हिंगणगावचे जयवंत भोईटे यांची पायाने दिव्यांग असूनही गेली ३५ वर्षे अखंडित पायी आषाढी वारी
पुढील बातमी
सुबह हो गई मामू... लोकशाहीची सकाळ झाली; आम्ही राजीनामा घेऊन दाखवला, अभिजीत दीपकेची पहिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या