देशाच्या राजधानीत दुमदुमली डीजीआयपीआरची ग्लोबल वारी; ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 24 July 2026


नवी दिल्ली : काल सायंकाळी आषाढी एकादशीनिमित्त झालेला कार्यक्रम आपल्या विभागासाठी एक नवा माईल स्टोन ठरला ! अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून निर्मित ‘पंढरपूर वारी' या सुंदर माहितीपटाचे  विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. 

महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत  झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, सौ. प्रतिभा पवार,  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मेधा कुलकर्णी, बजरंग सोनवणे, भाऊसाहेब वाकचौरे, , रामराव वडकुते , श्रीरंग बारणे, राजेंद्र जैन आणि ओमराजे निंबाळकर आदी खासदारांसह केंद्रीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते.

पवार साहेबांसह सर्व मान्यवरांनी आपला माहितीपट लक्षपूर्वक पाहिला आणि मनापासून प्रशंसाही केली. प्रशिक्षणासाठी दिल्लीत आलेले 'माहिती व जनसंपर्क'चे सर्व सहकारीही विभागाच्या या कौतुकवारीचे साक्षीदार झाले होते ! माननीय महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह सरांच्या नेतृत्वाखाली विभागाने एक नवी उंची गाठली आहे. या प्रतिमेला साजेसे काम दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राकडून होणे आम्हासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे !



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे २६ जुलै रोजी महाराजस्व समाधान शिबिर'; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आयोजन

संबंधित बातम्या