जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सातार्‍यात युवा क्रांतीची रॅली; आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी युवा क्रांती, सातारा यांच्या वतीने आज सकाळी गांधी मैदान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शाहू चौकपर्यंत समर्थन रॅली काढण्यात आली.

या रॅलीत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी परीक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळ, पेपरफुटीच्या घटना, परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जाणे, विद्यार्थ्यांवर वाढत असलेला मानसिक ताण तसेच जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधावा, आंदोलनावरील पोलीस कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

युवा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ही समर्थन रॅली आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील तरुणांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एकजूट दाखवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. रॅलीदरम्यान विविध घोषणाबाजी करून आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले. या समर्थन रॅलीत मोठया संख्येने युवक-युवती, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्पिरीटच्या अवैध वाहतुकीवर उत्पादन शुल्कची कारवाई; शेंद्रे येथे 200 लिटर मद्यार्कासह 9.12 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर केंद्र सरकार गंभीर; आंदोलनाचे राजकारण करू नका : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नीट पेपरफुटीतील दोषींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटले

संबंधित बातम्या