सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सतीश बजरंग वाघमळे (रा. वाघजाई नगर कण्हेर, ता. सातारा) हे तेथीलच एका उसाच्या पिकाच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 1360 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.