वाहन देण्याच्या कारणातून युवकास मारहाण; पाच लाख रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा : वाहन देण्याच्या कारणातून युवकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निखिल शेडगे (रा. अंगापूर, ता. सातारा) यांच्या सांगण्यावरून प्रथमेश प्रकाश पावशे (रा. देगाव, ता. सातारा) हा युवक त्याची गाडी घेण्यासाठी गेला असता ओम निकम आणि दाद्या पवार दोघेही (रा. कोडोली, सातारा) यांनी प्रथमेश यास लाथाबुक्क्यांनी, कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच पाच लाख रुपयांची खंडणी मागत त्याला साताऱ्यात कारमधून फिरवत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे प्रथमेश याने तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरम पूर्ण करून सातारा पालिकेच्या सभेत 46 ठरावांना मंजुरी; खासदार समर्थक नगरसेवक गैरहजर, विकासकामांवरील महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब
पुढील बातमी
कण्हेर येथे अवैधरित्या दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या