करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात; "ज्ञानोबा माऊली तुकाराम" जयघोषात पालखीची मिरवणूक

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा:  करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पालखी दिंडी भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडली. 

छोट्या वारकऱ्यांनी हातात टाळ, मृदुंग, तुळशी  सह भक्तिमय वातावरणात पालखीची मिरवणूक काढली दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या "ज्ञानोबा माऊली तुकाराम" या जयघोषाने करंजे नगरी न्हाऊन निघाली. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय व वारी परंपरा प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद मिळाला. 

दिंडीच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव तुषार पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक रवींद्र निकम व सर्व सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बँकनिहाय आकडेवारीनुसार ५६९.४० कोटी होणार माफ
पुढील बातमी
सातार्‍यात युनायटेड यूथ फ्रंटचा मोर्चा; दिल्लीत विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध; पेपरफुटीची चौकशीची मागणी

संबंधित बातम्या