सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बँकनिहाय आकडेवारीनुसार ५६९.४० कोटी होणार माफ

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील विविध ११ बँकांमधील ५४ हजार ३०१ पात्र कर्ज खात्यांपैकी ५३ हजार ७३६ कर्ज खात्यांची माहिती आतापर्यंत शासनाच्या अधिकृत पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड केली आहे. या माध्यमातून सुमारे ५६९.४० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या बँकनिहाय आकडेवारीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक कामगिरी केली आहे. या बँकेची ४१ हजार ८८१ कर्ज खाती (रक्कम ३८३.०९ कोटी) पात्र होती. त्यापैकी ४१ हजार ४२१ खात्यांची माहिती (३७८.८९ कोटी) पोर्टलवर अपलोड झाली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या तीन हजार ४४८ खात्यांची (४५.७४ कोटी) पूर्ण माहिती पोर्टलवर जमा झाली आहे. त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रने चार हजार ९०५ खाती (६७.०० कोटी), आयडीबीआय बँकेने एक हजार ३५ खाती (२१.७२ कोटी) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने एक हजार ५१ खाती (२०.४७ कोटी) शंभर टक्के अपलोड केलीत. 

आयसीआयसीआय बँकेतील पात्र ३७२ खात्यांपैकी २६७ खाती (१३.०५ कोटी) अपलोड झाली असून, उर्वरित काम सुरू आहे. बँक ऑफ बडोदा ४८५ खाती, (७.८४ कोटी), कॅनरा बँक (७७४ खाती, ८.५८ कोटी), युनियन बँक (३१७ खाती, ५.१३ कोटी), फेडरल बँक (२१ खाती, ०.८० कोटी) आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक (१२ खाती, ०.१८ कोटी) यांनी सर्व पात्र कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर नोंदवली आहे. एकूण ५७७.६३ कोटींच्या पात्र रकमेपैकी ५६९.४० कोटींची नोंदणी पूर्ण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोट्या ड्रग्स केसमध्ये आंदोलकांना अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

संबंधित बातम्या