दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग चार दिवस झाले तरीही काहीही कामकाज होऊ शकलेले नाही. २० जुलैपासून अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र, गुरूवारीही कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
सलग चौथ्या दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक दिसले. सरकारने आधी प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, त्यानंतरच चर्चा करून अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. तर विरोधक अटींसह चर्चा करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राजीनाम्याच्या मागणीवर कोणताही तोडगा न निघाल्याने कोंडी कायम आहे.