फलटणच्या संकेत कदमची अभिमानास्पद कामगिरी; ऑर्बिटल रॉकेट 'विक्रम-१' मोहिमेमध्ये सहभाग, कुटुंबीयांवरती सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

by Team Satara Today | published on : 21 July 2026


सातारा :  नुकतेच भारताने अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत देशातील पहिले खासगीरीत्या विकसित केलेले ऑर्बिटल रॉकेट 'विक्रम-१' यशस्वीरीत्या अंतराळात प्रक्षेपित केले.  हे रॉकेट हैदराबादस्थित 'स्कायरूट एरोस्पेस' (Skyroot Aerospace) या अंतराळ-तंत्रज्ञान स्टार्टअपद्वारे विकसित केले गेले आहे. या मोहिमेमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मलटण येथील संकेत दत्तात्रय कदम हा सहभागी होता.संकेत व त्याच्या संपूर्ण टीमने केलेल्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संकेत व त्याच्या कुटुंबीयांवरती सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

गौरवाची बाब म्हणजे या मोहिमेमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मलटण येथील संकेत दत्तात्रय कदम हा सहभागी होता. संकेत व त्याच्या संपूर्ण टीमने केलेल्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संकेत व त्याच्या कुटुंबीयांवरती सर्वांकडून कौतुकाचा वर्ष होत आहे. संकेतचे वडील सातारा जिल्हा पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगिरीसाठी त्याच्या कुटुंबीयांचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील फोन करून कौतुक केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद
पुढील बातमी
मांढरदेव प्राथमिक शाळेत पायी दिंडी उत्साहात साजरा; दिंडी सोहळ्यामुळे गावामध्ये भक्तीमय वातावरण

संबंधित बातम्या