बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद

by Team Satara Today | published on : 21 July 2026


सातारा : सातार्‍यातील मंगळवार पेठ परिसरातील कस्तुरी पार्क येथे राहणार्‍या विकास सुनील शिंदे (वय 33) यांचा बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सातार्‍यातील खासगी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार डमकले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरफळ येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला ट्रकची धडक; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
फलटणच्या संकेत कदमची अभिमानास्पद कामगिरी; ऑर्बिटल रॉकेट 'विक्रम-१' मोहिमेमध्ये सहभाग, कुटुंबीयांवरती सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

संबंधित बातम्या