सातारा : आरफळ (ता. सातारा) येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला भरधाव ट्रकने धडक दिल्याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या अपघातात दीपक सुधाकर पवार (वय 48, रा. आरफळ) हे जखमी झाले. याप्रकरणी अनुजा रमेश जाधव (रा. दहिवडी रोड, वडूज) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास हवालदार कारळे करीत आहेत.