सायबर गुन्ह्यातील रक्कम खात्यात जमा; धुमाळवाडीतील युवकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी येथील एका युवकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल चंद्रकांत शिंदे (रा. धुमाळवाडी, ता. कोरेगाव) याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सातारा शाखेत ’व्ही. एस. इंटरप्रायझेस’ या नावाने चालू खाते सुरू केले होते. एनसीसीआरपी पोर्टल व बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, या खात्यात विविध राज्यांतील बँक खात्यांतून एकूण 1 लाख 72 हजार 180 रुपये जमा झाल्याचे तपासात उघड झाले.

प्राथमिक चौकशीत ही रक्कम सायबर फसवणुकीतून मिळालेली असल्याचे समोर आले आहे. आरोपीचा सायबर गुन्हेगारीशी संबंधित टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्याच्यासह इतर साथीदारांविरोधात देशभरातील 13 तक्रारी दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

30 डिसेंबर 2025 ते 13 जून 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डुबल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर; महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी
पुढील बातमी
महामार्गावर बोरगाव पुलाजवळ भरधाव ट्रक डिव्हायडरवर आदळून पलटी; रेलिंगचे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या