वेदभवन मंगल कार्यालयाच्या वधू कक्षातील खोलीतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस

by Team Satara Today | published on : 17 July 2026


सातारा : शहरातील वेदभवन मंगल कार्यालय येथील वधू कक्षातील खोलीतून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वेदभवन मंगल कार्यालयातील वधू कक्षातील खोलीत ठेवलेली फिर्यादी यांच्या पत्नीची निळ्या रंगाची पर्स, त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही बाब नंतर फिर्यादी यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी सुभाष आनंदा मुळीक (वय 65, रा. भाटवडे, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटखळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद
पुढील बातमी
फलटण नगरीत श्री संत ज्ञानेश्वर पालखीचे जल्लोषात स्वागत; मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम

संबंधित बातम्या