सातारा : शहरातील संगमनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 जुलै ते 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान चाहूरखेड, गजानन पार्क, संगमनगर (सातारा) येथील रहिवासी प्रभाकर मल्हार इनामदार (वय 69, सेवानिवृत्त शिक्षक) यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेल्या पर्समधून 8 हजार रुपये किमतीची सुमारे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची बाल अंगठी तसेच 5 हजार रुपये किमतीचे सुमारे 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सावजी अधिक तपास करत आहेत.