सातारा : आंबेदरे, ता. सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 31 हजारांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नंदा दिलीप निकम (रा. आंबेदरे आव्हाडवाडी, निकमवाडी, ता. सातारा) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा कशानेतरी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 31 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.