१६ जुलै ते २२ जुलै २०२६ हा कालावधी ‘भूजल सप्ताह’ म्हणून साजरा केला जात असून, या निमित्ताने सातारा जिल्ह्यात भूजल संवर्धन आणि जलसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. राज्यातील भूजल संसाधनांच्या शोध, विकास आणि व्यवस्थापनासाठी स्थापन झालेली भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) गेल्या अनेक दशकांपासून सातारा जिल्ह्यात महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
सातारा जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्रोत भूजलावर अवलंबून आहेत. त्यामुळे या स्रोतांचे संरक्षण, पुनर्भरण आणि शाश्वत व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी भूजल सर्वेक्षण, विंधन विहिरींसाठी स्थळ निश्चिती, जलस्रोत बळकटीकरण तसेच कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना सातत्याने राबविल्या जात आहेत.
ग्रामीण भागातील नळपाणी योजनांना सक्षम करण्यासाठी भूजलशास्त्रीय सर्वेक्षण, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, जलस्रोतांची शाश्वतता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष भर दिला जात आहे. रिमोट सेन्सिंग, जीआयएस नकाशे आणि भूभौतिकीय सर्वेक्षण यांसारख्या आधुनिक साधनांच्या मदतीने भूजल उपलब्धतेचा अधिक अचूक अभ्यास केला जात आहे. जनतेला सुरक्षित आणि शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवणे हाच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सातारा यांचा मुख्य उद्देश आहे. यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विंधन वेरी कोपनलिकेच्या खुदाईसाठी स्थळ निश्चित करणे. गाव पातळीवर गाव पातळीवर विशिष्ट भूजल शास्त्रीय स्थिती तपासण्यासाठी व भूजल युक्त संभाव्य क्षेत्र तसेच पुनर्भरणास योग्य क्षेत्राचा तपास करण्यासाठी सखोल भूजल शास्त्रीय सर्वेक्षण करणे.
ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांकरिता विहिरींचे स्त्रोत निश्चित करणे भूजल शास्त्रीय सर्वेक्षण करून भूजल संदर्भात संसाधनांच्या बळकटीकरणासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी पारंपारिक जलसंवर्धन आणि कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि अंमलबजावणी करणे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी सर्वेक्षण करणे. स्त्रोत शाश्वततेसाठी कमी खर्चात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा संबंधित उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पाण्याच्या गुणवत्ता बाधित गावांमध्ये सर्वेक्षण करणे. तसेच जिल्हा प्रयोगशाळा सातारा व उपविभागीय प्रयोगशाळा कराड, सोमर्डी, खंडाळा व दहिवडी येथे गुणवत पाणी गुणवत्ता रासायनिक व जैविक तपासणी करून अहवाल शासनास सादर करणे.
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या संरक्षणासाठी शासनाने भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 लागू केला व त्यानंतर अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र भूजल अधिनियम 2013 तयार केले. या कायद्याच्या विविध विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून पाणलोटांचे विभाजन तांत्रिक अहवाल तयार करणे अधिसूचित भागातील तांत्रिक सर्वेक्षण इत्यादी कामांची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहे .
जिल्ह्यातील भूजल पातळी व भूजल गुणवत्तेचे नियतकालिक निरीक्षण जेणेकरून पाणलोट क्षेत्रांवर भूजल युक्त आणि पाणी गुणवत्ता प्रभावित क्षेत्रांचे मूल्यांकन करणे.
भूजल शास्त्रीय सर्वेक्षणाचे पुष्टीकरण करण्यासाठी समर्थन देण्यासाठी आणि कठीण भूप्रदेशात पिण्याच्या पाण्याच्या स्वतःची शाश्वतता यशस्वीता सुधारण्यासाठी वाडी व्हीएलएफ सारख्या नवीनतम साधनांचा वापर करून भौतिक सर्वेक्षण केले जात आहे. कठीण क्षेत्रामध्ये सामान्य भूजल शास्त्रातील सर्वेक्षणासह भूजलाच्या विकासासाठी जी कामे हाती घेताना सुदूर संवेदनाचा(रिमोट सेन्सिंग) वापर करण्यात येत आहे. मोठ्या क्षेत्रातील भूजल क्षेत्र शोधण्याकरिता जीआयएस नकाशे वापरले जातात.
टंचाई कालावधीत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सातारा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी कमीत कमी खर्चाच्या उपायोजना सुचवण्यासाठी सर्वेक्षणाचे काम करीत आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात जसे भूस्खलन, भूकंप इत्यादीमध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सातारा आपत्कालीन परिस्थिती जिल्हा प्रशासनात शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून सर्वेक्षण अहवाल सादर करते.
पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण सुरक्षित करण्यासाठी गौण खनिज सर्वेक्षण करून वाळू उत्खननाबाबत शिफारस केली जात आहे.
सातारा जिल्ह्याला निसर्गाने दिलेली आणखी एक अमूल्य देणगी म्हणजे महाबळेश्वर परिसरातील जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जाणारा ‘डेक्कन ट्रॅप’ भूवारसा. सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी प्रक्रियेतून निर्माण झालेल्या या भूभागाने जगभरातील संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भूविज्ञान, भूजल आणि पर्यावरणीय अभ्यासासाठी हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये साताऱ्याच्या वैभवात भर घालतात.
भूजल सप्ताह हा केवळ जनजागृतीचा उपक्रम नसून, जलसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणारा संदेश आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी बचत, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण यामध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. जलसंपन्न, पर्यावरणपूरक आणि शाश्वत सातारा घडविण्यासाठी हीच खरी काळाची हाक आहे.